सांगली - घरचं अठराविश्व दारिद्रय, घरच्यांनी आठवीतच तिचं लग्न उरकायचं ठरलं. मला लग्न करायचं नाही; शिकायचंय असं सांगत तीने शिक्षकांकडे धाव घेतली. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करीत तिचं लग्न रोखलं आणि तिचं शिक्षण सुरु झालं. आता तिला डॉक्टर व्हायचंय. तिच्या या स्वप्नपुर्तीसाठी नेदरलॅन्डच्या ड्रीक आणि जोस ड्रॉल या उद्योजक दांम्पत्यानी बळ दिलंय.
जत तालुक्यातील जालीहाळ (बु) मधील रुक्मिीणी परशुराम खोत या मुलीची ही कथा.